माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:21+5:302021-06-19T04:14:21+5:30

जिजामाता विद्यालयाच्या वतीने उपक्रम लातूर : १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्या ...

Greetings at Mount Litera Zee School | माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये सत्कार

माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये सत्कार

Next

जिजामाता विद्यालयाच्या वतीने उपक्रम

लातूर : १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील जिजामाता विद्या संकुलात अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य नसल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्राचार्या सलिमा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.

मल्लखांब दिनानिमित्त लातुरात कार्यक्रम

लातूर : रामलिंगेश्वर स्पोर्टस्‌ अकॅडमी मध्ये मल्लखांब दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. महादेव झुंजे, योगिराज बिडवे, राजकुमार बिडवे, प्रा. राकेश बिडवे, राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक रामलिंग बिडवे, आशा झुंजे, योगेश पंडित, अर्णव बिडवे, विहान बिडवे, वेदांत कुलकर्णी आदींसह खेळाडूंची उपस्थिती होती. यावेळी मल्लखांबच्या पोलचे पूजन करण्यात आले.

सोमनाथ स्वामी यांचा लातुरात सत्कार

लातूर : येथे प्रा. सोमनाथ स्वामी यांचा शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, लिंबन महाराज रेशमे, विनोद आर्य, शिवाजी माने, डॉ. शोभाताई बेंजरगे, सुनीता चाळक, भागवत वंगे आदींसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

वसुंधरा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चिखलीकर

लातूर : येथील वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. अजित चिखलीकर यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी डॉ. बी.आर. पाटील, सुवर्ण जगताप, गुरुशांत ढोणे, परमेश्वर पाटील, निलेश चलमले, गणेश पांचाळ, सचिन शिंदे, अजय शिंगनाथ, सुनील मिठागरे आदींची उपस्थिती होती.

स्वामी दयानंद विद्यालयाच्या वतीने उपक्रम

लातूर : कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थी शाळेत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष गृह भेटीचा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Greetings at Mount Litera Zee School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.