कोरोनाच्या संकटात आशा स्वयंसेविकांचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:02+5:302020-12-12T04:36:02+5:30
तालुक्यातील लातूर रोड येथील संत गोविंदबाबा मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना साडी व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ...

कोरोनाच्या संकटात आशा स्वयंसेविकांचे मोठे योगदान
तालुक्यातील लातूर रोड येथील संत गोविंदबाबा मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना साडी व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे होते. यावेळी गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, घरणीचे सरपंच भानुदासराव पोटे, लातूर रोडचे उपसरपंच अब्दुल शेख, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, बालाजी सूर्यवंशी, शिवदर्शन स्वामी, गणेश फुलारी, सिध्देश्वर अंकलकोटे, शिवकुमार चांदसुरे, अनिल वाडकर, संजय मारापल्ले, करिमसाब गुळवे, दयानंद सुरवसे, गणपत कवठे, ॲड. संतोष गंभीरे, नागोराव पाटील, तुकाराम जाधव, रामदास घुमे, अमोल शेटे, अजित सौदागर, गणेश शिंदाळकर, बिलाल पठाण, नागेश बेरुळे, सचिन तोरे आदी उपस्थित होते.
शासन नियमांचे पालन करावे...
आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, आशा स्वयंसेविकांना मानधन कमी असतानाही त्यांचे कोरोना संकटातील काम मोठे आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे, तेवढे कमी आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार आणि आशा स्वयंसेविकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अतिशय महत्त्वाचे कार्य केले आहे. सध्या काेरोनाचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. तसेच शासन नियमांचे पालन करावे.
***