शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन खर्च सादरीकरणाची ग्रामपंचायत उमेदवारांना चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

लातूर : निवडणूक मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच ऑनलाईन खर्च सादर करावा लागणार ...

लातूर : निवडणूक मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच ऑनलाईन खर्च सादर करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत उमेदवारांची चिंता वाढली आहे. ट्रू-व्होटर ॲपवर खर्च सादर केल्यानंतर त्याची प्रिंट तहसीलदारांकडे सादर करावी लागणार आहे.

जिल्ह्यात ३८३ ग्रामपंचायतींच्या ३ हजार १७२ जागांसाठी निवडणूक झाली होती. जवळपास ७ हजार ५५६ उमेदवार होते. या सर्व उमेदवारांना आता ऑनलाईन खर्च सादर करावा लागणार आहे. ७ ते ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील उमेदवारांना प्रत्येकी २५ हजार, ११ ते १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतील उमेदवारांना ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील उमेदवारांना प्रत्येकी ५० हजार रुपये खर्च करण्याची मुभा होती. या मर्यादेनुसार खर्च केला की त्यापेक्षा अधिक या अनुषंगाने खर्च निरीक्षकांकडून तपासणी झालेली आहे. आता त्याचा अंतिम खर्च अहवाल तहसीलदारांकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन सादर करावा लागणार आहे. ऑनलाईन खर्च सादर केल्यानंतरच ऑफलाईन प्रिंट देता येणार आहे. मात्र, ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी आणि अन्य समस्यांमुळे अडचणी येत आहेत.

कागदपत्रे जमा केली आहेत. शपथपत्र, बाँड, खर्चाच्या पावत्या एकत्र करून दिल्या आहेत. चहा पाणी, झेराॅक्स, बॅनर पावत्या आदीबाबतच्या सर्व खर्चाची नोंद आहे. दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या प्रमाणातच तो खर्च आम्ही केलेला आहे. त्याचा हिशेब आमच्या वहीमध्ये नोंदविलेला आहे. सदर हिशेब वही तहसीलदारांकडे सादर केली जाईल. ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन केला जाईल.

-विश्वनाथ कागले, खरोळा

मोबाईल रेंजची अडचण

बहुतांश उमेदवारांकडे अँड्राॅईड मोबाईल असला तरी ग्रामीण भागात रेंजची अडचण आहे. त्यामुळे आयोगाने दिलेल्या ॲपवर खर्च सादर करणे अडचणीचे ठरत आहे. नेट कॅफेवर जाऊन ट्रू-व्होटर ॲपवर खर्च सादर करावा तर तालुक्याच्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे. नेट कॅफेवरही अन्य कामांची गर्दी आणि सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने तासन्‌तास वेटिंग करावी लागत आहे. इकडे ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक असल्याने धावपळ होत आहे.

ट्रू-व्होटर ॲपवर खर्च सादर करून त्याची प्रिंट तहसीलदारांना उमेदवारांनी द्यावी. मोबाईल रेंज कनेक्टिव्हिटीची अडचण आणि अन्य तांत्रिक समस्या उद्‌भवत असतील तर संबंधित उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज तहसील कार्यालयात सादर करावा. मतमोजणी नुकतीच झाली आहे. ३० दिवसांचा अवधी असतो. त्यामुळे उमेदवारांच्या धावपळीचा विषय नाही. वेळ आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. वेळेत व नियमाने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

-गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी,

सामान्य प्रशासन विभाग, लातूर