रस्ते, पूल दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:47+5:302021-06-16T04:27:47+5:30
तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे सोमवारी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी भाजपचे ज्ञानेश्वर वाकडे, सरपंच रामलिंग होगाडे, उपसरपंच चंद्रकांत ...

रस्ते, पूल दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिला नाही
तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे सोमवारी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.
यावेळी भाजपचे ज्ञानेश्वर वाकडे, सरपंच रामलिंग होगाडे, उपसरपंच चंद्रकांत नाकाडे, पंचायत समिती सदस्य नारायण इंगळे, महिला आघाडी अध्यक्षा कल्पना ढविले, जिलानी बागवान, धनराज होळकुंदे, परमेश्वर बिराजदार, लालामियाॅ शेख, दीपक ढविले, बळी पाटील आदी उपस्थित होते.
आ. अभिमन्यू पवार म्हणाले, मतदारसंघातील औसा, लामजना, कासारसिरसी व किल्लारी बसस्थानकासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी औसा व लामजना येथील काम सुरू असून कासारशिरसी व किल्लारी येथील निधी कोविडच्या पार्श्वभूमीवर परत गेला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत राज्यातील सरकारने विमा कंपनीशी केलेल्या कराराचे निकष बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या विरोधात आगामी काळात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील रामलिंग मुदगडवाडी, रामलिंग मुदगड, हासुरी (बु.), हासुरी (खु.), शाबीतवाडी, हरिजवळगा व बोळेगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.