इस्कॉनच्यावतीने गीता जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:35+5:302020-12-30T04:26:35+5:30
यामध्ये १० व्यक्तींनी गीता दान केल्या. तुलादानमध्ये डॉ. अशोक पोतदार, मालिनी माताजी, निखील जोशी, सिंधू कदम, नम्रता जाजु, मारोती ...

इस्कॉनच्यावतीने गीता जयंती उत्साहात साजरी
यामध्ये १० व्यक्तींनी गीता दान केल्या. तुलादानमध्ये डॉ. अशोक पोतदार, मालिनी माताजी, निखील जोशी, सिंधू कदम, नम्रता जाजु, मारोती म्हंकराज, उषाबाई म्हंकराज व पी. विवेकानंद सरांचे वडील व आई यांच्या तुला करण्यात आल्या, तसेच वैदिक पद्धतीने गीता दान यज्ञ करण्यात आला. त्यामध्ये ५१ यजमानांनी विशेषतः जोशी मॅथ्स क्लासेसचे जोशी सर, मोटेगावकर क्लासेसचे शिक्षक वृंद, बिराजदार सर, एसके हॉस्टेलचे कराड सर, लातूर गर्ल्स हॉस्टेलचे जाधव सर यांनी भाग घेतला. गीतेवरील प्रवचन श्रीमान रूप रघुनाथ दास ब्रह्मचारी यांनी दिले. त्यांनी गीतेचा उपदेश आधुनिक युगात कसा सयुक्तिक व उपयोगी आहे, हे पटवून सांगितले. त्यांच्या हस्ते मास्टर पी. हरिकृष्णा याचा टेबल टेनिसमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता हरिनाम संकीर्तनाने झाली. सर्व उपस्थितांना एकादशी प्रसाद वाटप करण्यात आला.