रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:32+5:302021-08-22T04:23:32+5:30

लातूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांना आता रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल ...

Get Universal E-Pass at Home for Mall Access with Rail, Air Travel! | रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास!

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा युनिव्हर्सल ई-पास!

लातूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांना आता रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी युनिव्हर्सल पास ऑनलाईन लिंकवरून मिळत आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर निर्धारित वेळेनंतर या लिंकवरून स्वत:चे छायाचित्र अपलोड करून माहिती भरली, त्यांनाही पास उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात ३१ टक्के नागरिकांना पहिला, तर ११ टक्के नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून जिल्ह्यात ४२ टक्के लसीकरण झाले असल्याचे आराेग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

लसीचा मागणीनुसार होतोय पुरवठा...

जिल्ह्यात मागणीनुसार लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात दररोज लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस मिळून ४२ टक्के लसीकरण झाले आहे. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी

दोन्ही डोस घेतले किती...

फ्रंटलाईन वर्कर्स २६,९७७

आरोग्य कर्मचारी १५,५९७

१८ ते ४४ वयोगट २,६८,०२९

४५ पेक्षा अधिक वयोगट १,४९,५१२

एकूण झालेले लसीकरण ८,५९,३९३

Web Title: Get Universal E-Pass at Home for Mall Access with Rail, Air Travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.