वाहनासह पाच लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: June 11, 2025 21:52 IST2025-06-11T21:52:19+5:302025-06-11T21:52:37+5:30

लातुरात गुन्हा : ‘स्थागुशा’च्या पथकाची कारवाई

Ganja worth five lakhs seized along with vehicle; three arrested | वाहनासह पाच लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक

वाहनासह पाच लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक

राजकुमार जाेंधळे

लातूर : वाहनासह चार लाख ४५ हजारांचा ११.७ किलो गांजा स्थागुशाच्या पथकाने सायंकाळी ५ वाजता जप्त केला. यावेळी दाेघा महिलांसह एका युवकाला अटक केली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. रेणापूर नाका येथील बसस्थानक परिसरात दोन महिला आणि पुरुष ऑटोत बसून गांजाची चोरट्या मार्गाने विक्री करीत आहेत. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा मारला. येथे दोन महिलांसह एक पुरुष ऑटोत बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेत कसून चाैकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे गोपाळ बालाजी डावखरे (२७), मयुरी शंकर वाघमारे (२०, दाेघेही रा. सारोळा रोड, लातूर) आणि राधाबाई आश्रुबा गायकवाड (६०, रा. भीमनगर, परभणी), असे सांगितले. यांना ताब्यात घेत ऑटोची झाडाझडती घेतली असता, एका पोत्यात बी-मिश्रित गांजा आढळून आला. त्याचे वजन ११ किलो ७०० ग्रॅम (किंमत दोन लाख ३४ हजार) आहे. याबाबत दोघा महिलांसह एक पुरुषाविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी ऑटो, दोन मोबाइल आणि गांजा, असा चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, नितीन कठारे, राहुल कांबळे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, सचिन धारेकर, बंडू निटुरे, संतोष देवडे, कुंभार, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.
फाेटाे फाईल नेम : ११०६ लातूर ०२

Web Title: Ganja worth five lakhs seized along with vehicle; three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.