शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

लातूरमध्ये वंध्यत्व निवारणासाठी गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगावर मोफत लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:03 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया; महिला रुग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पसरला आनंद

लातूर : गर्भपिशवीच्या जन्मजात व्यंगामुळे गर्भधारणेची समस्या निर्माण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे एका महिलेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे वंध्यत्व निवारण होत असल्याने महिला रुग्ण व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग विभाग, इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट्स (आयएईजीई), फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय), लातूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटी (एलओजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईगल प्रोजेक्टअंतर्गत एक दिवसीय लेप्रोस्कोपी व हिस्टोरोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया कार्यशाळा बुधवारी घेण्यात आली.

कार्यशाळेसाठी प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख तथा लातूर स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. भाऊराव यादव, सचिव डॉ. स्वप्ना कदम यांनी पुढाकार घेतला होता. यशस्वीतेसाठी डॉ. मुशीर शेख, डॉ. विष्णू तारसे, डॉ. शीतल लाड, डाॅ. सुचिता सूर्यवंशी, डॉ. रामदास पांचाळ यांच्यासह पदव्युत्तरचे विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

८ जटिल, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया...कार्यशाळेत जटिल आणि गुंतागुंतीच्या ८ महिलांवर लेप्रोस्कोपी व हिस्टोरोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात डॉ. कल्याण बरमदे, डॉ. राजेश दरडे, डॉ. नितीन शहा, डॉ. कृष्णा मंदाडे, डॉ. गणेश बंदखडके, डॉ. कुणाल जाधव, डॉ. अनिता पवार यांनी शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ज्ञ डॉ. विनायक सिरसाट, डॉ. किरण तोडकरी, डॉ. सुरेखा मोरे यांनी सहकार्य केले.

२५ प्राध्यापक सहभागी...स्त्रीराेग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एमआयएमएसआर, अंबाजोगाईतील एसआरटीसी वैद्यकीय महाविद्यालयातील २५ प्राध्यापक आणि ५५ पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आधुनिक पध्दतीने शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात आठ जटिल आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.- डॉ. भाऊराव यादव, विभागप्रमुख, प्रसूती व स्त्रीरोग.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्यWomenमहिला