विजयकुमार घाडगे-पाटील मारहाण प्रकरणी लातूरमधून आणखी चाैघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: July 22, 2025 21:09 IST2025-07-22T21:09:04+5:302025-07-22T21:09:25+5:30
Latur Crime News: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंगळवारी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी आणखी चाैघांना अटक केली. अटक केलेल्या एकूण आराेपींची संख्या सहा झाली आहे. अद्याप पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.

विजयकुमार घाडगे-पाटील मारहाण प्रकरणी लातूरमधून आणखी चाैघांना अटक
- राजकुमार जाेंधळे
लातूर - छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंगळवारी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी आणखी चाैघांना अटक केली. अटक केलेल्या एकूण आराेपींची संख्या सहा झाली आहे. अद्याप पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समाेर आल्यानंतर रविवारी लातुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाऊन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नाेंदवला. यावेळी त्यांनी तटकरे यांच्यासमाेर पत्ते टाकले. या प्रकाराने संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील व कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात साेमवारी पहाटे सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविराेधात गुन्हा दाखल केला असून, यातील लाला सुरवसे आणि अभिजित सगरे पाटील यांना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. तर, अमित क्षीरसागर, राजू बरगे, सिद्दीकी मुल्ला आणि वसिम मुल्ला यांना मंगळवारी अटक केली आहे.
अन्य पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध
छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणात एकूण ११ जणांविराेधात गुन्हा दाखल असून, आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.
- संताेष पाटील, पाेलिस निरीक्षक, लातूर