खाद्यपदार्थांत भेसळखाेरांनी भेसळ तर केली नाही ना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST2021-08-19T04:24:50+5:302021-08-19T04:24:50+5:30
सध्याला खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर असल्याची शक्यता असल्याने अशा पदार्थांची तपासणी करण्यात येत आहे. तेल, खवा, विविध खाद्य ...

खाद्यपदार्थांत भेसळखाेरांनी भेसळ तर केली नाही ना !
सध्याला खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर असल्याची शक्यता असल्याने अशा पदार्थांची तपासणी करण्यात येत आहे. तेल, खवा, विविध खाद्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण माेठे असल्याचे आढळले आहे. शिवाय, फळांना पिकविण्यासाठी करण्यात येणाऱ्या केमिकलचा वापर आराेग्यासाठी घातक आहे. मात्र, रासायनिक प्रक्रिया करून फळे बाजारात आणण्याचे प्रमाणही कमी नाही. यासाठी फळे आणि इतर वस्तूची खरेदी करताना त्यांच्या रंग आणि रूप न पाहता, त्यांची गुणवत्ता तपासण्याची खरी गरज आहे. याबाबत नागरिकांनीच चाैकस राहायला पाहिजे, अन्यथा आपली फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरेदी करताना ही घ्या काळजी...
ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करताना त्यावर कुठला मार्क आहे हे तपासले पाहिजे. ग्रीन मार्क असलेत तर वस्तू व्हेज आहे. ब्राउन मार्क असेल तर ती नाॅनव्हेज आहे. उत्पादनाची तारीख कुठली आहे, समाेरचा कालावधी किती आहे. ठिकाण आणि कंपनीचे नाव याबाबतच्या सर्व बाबी तपासणे गरजेचे आहे.
२५ टक्के
नमुन्यातील भेसळ काेराेना काळातील...
काेराेनाच्या काळात खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांची माेठ्या प्रमाणावर झुंबड उडत हाेती. दरम्यान, याच गर्दीचा फायदा काही नफेखाेर व्यापाऱ्यांनी घेतल्याचे समाेर आले आहे. मर्यादित काळावधीत माेठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री झाली. याच संधीतून अधिक नफा कमावण्यासाठी काहींनी माेठ्या प्रमाणावर भेसळ केली.
सणासुदीमध्ये अधिक भेसळ...
दरवर्षी सणासुदीच्या काळातच माेठ्या प्रमाणावर भेसळीचा बाजार तेजीत असताे. खास करून तेलामध्ये आणि गाेड पदार्थात भेसळ केली जात असल्याचे समाेर आले आहे. गरम केलेल्या तेलात अनेकदा अशी भेसळ पहायला मिळते. खवा, पेढा, दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ हाेत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने वर्षभर ठिकठिकाणी छापे मारले जातात. संशयास्पद वाटणाऱ्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले जाताते. ते नमुने प्रयाेगशाळेला पाठविले जातात. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधितांवर कारवाई करण्यात येते. काेराेना काळात चाचण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समाेर आले आहे. भेसळखाेरांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असल्याचे सूत्रांनी सांगितले.