वर्क ऑर्डरचे आमिष देऊन पाच लाखाला गंडविले, अहमदनगरच्या एकाविरुद्ध लातुरात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:41 IST2022-07-13T19:39:06+5:302022-07-13T19:41:53+5:30
फिर्यादीने कामाची वर्क ऑर्डर देण्याची विनंती केली. मात्र, आज, उद्या देताे म्हणत काेराेनाचे कारण सांगू टाळाटाळ केली.

वर्क ऑर्डरचे आमिष देऊन पाच लाखाला गंडविले, अहमदनगरच्या एकाविरुद्ध लातुरात गुन्हा
- राजकुमार जोंधळे
लातूर : वर्क ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुधीर ऊर्फ अनिरुद्ध रमेश साळुंखे (वय ३७ रा. एमआयटी काॅलेज परिसर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
लातूर जिल्ह्याचे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत कामाचे त्यांनी पाठविलेल्या कामासंबंधीचे पीडीएफ पाहून अहमदनगर जिल्ह्यातील काकासाहेब खाडे (रा. राजुरा डाेळेवाडी) याच्या सांगण्यावरुन फिर्यादीने आपल्या लहान भावाच्या खात्यातून बॅक खात्यावर पाच लाख रुपये जमा केले.
दरम्यान, फिर्यादीने कामाची वर्क ऑर्डर देण्याची विनंती केली. मात्र, आज, उद्या देताे म्हणत काेराेनाचे कारण सांगू टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात घेतली. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. ३०७ / २०२२ कलम ४०६, ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.