तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST2021-08-23T04:23:07+5:302021-08-23T04:23:07+5:30

दंडाची थकबाकी वाढली... लातूर शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर तपासणीदरम्यान पाेलीस कर्मचाऱ्यांनी इ-चालानच्या माध्यमातून केलेल्या दंडाचा माेबाइलवर मेसेज मिळत ...

A fine of thousands on your vehicle | तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना

तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना

दंडाची थकबाकी वाढली...

लातूर शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर तपासणीदरम्यान पाेलीस कर्मचाऱ्यांनी इ-चालानच्या माध्यमातून केलेल्या दंडाचा माेबाइलवर मेसेज मिळत नाही.

अशावेळी संबंधित वाहनधारकांकडे दंडाची थकबाकी वाढत जाते. टप्प्या-टप्प्याने या दंडाच्या रकमेचा आकडा वाढत जाताे. मग, ही रक्कम वाहनधारकांना भरणे शक्य नसते.

ग्रामीण भागातील अनेक वाहनधारकांना इ-चालानबाबत माहिती नसते. ऑनलाइन दंड मारण्यात आल्याने, फारसे गांभीर्य वाटत नाही. खटला दाखल झाल्यावर थकीत दंडाची रक्कम समजते.

कसे फाडले जाते इ-चालान...

पाेलीस कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या वाहन तपासणीमध्ये अनेक वाहनधारक दाेषी असल्याचे आढळून येते. त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना नसताे. अशावेळी पाेलिसांकडून इ-चालन फाडले जाते. वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाते. ऑनलाइन दंडाची रक्कम आकारली जाते.

वाहनधारकांच्या माेबाइलवर इ-चालानचा मेसेज येताे. किती रुपयांचा दंड करण्यात आला आहे, ही माहिती समजते. थकीत दंडाचीही माहिती पाेलीस कर्मचाऱ्यांना समजते. थकलेला थंड भरण्याबाबत पंधरा दिवसांची मुदत दिली जाते. ज्याच्याकडे हा दंड थकला आहे, अशांना नाेटिसाही पाठविल्या जातात.

माेबाइल अपडेट केला आहे का...

वाहनधारकांनी आपला माेबाइल अपडेट करण्याची गरज आहे. आपल्याला करण्यात आलेला ऑनलाइन दंड, त्याबाबतचा मेसेज मिळण्यासाठी महत्त्चाचे आहे.

एखाद्या वाहनाला वर्षभरात किती दंड आणि किती वेळा ठाेठावण्यात आला आहे. याची माहिती क्षणात एका क्लिकवर संबंधित कर्मचाऱ्याला पाहता येते.

थकीत दंडाची रक्कम वाढत जात असेल तर, दंड भरण्याबाबत सतत वाहनधारकांना सूचित केले जाते. शिवाय, याबाबत पाठपुरावाही केला जाताे.

नियमांचे पालन करावे...

जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे साेबत ठेवावी, अपडेट ठेवावी. करण्यात आलेला दंड वेळीच भरावा. दंड थकला तर ताे तातडीने भरुन घेतला पाहिजे. निर्धारित वेळेत दंडाची रक्कम नाही भरल्यास पाेलिसांकडून त्यांना नाेटिसा पाठविल्या जातात. जे दंड भरत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाते.

- पाेलीस निरीक्षक सुनील बिर्ला, वाहतूक शाखा, लातूर

Web Title: A fine of thousands on your vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.