किल्लारी साखर कारखाना सुरू हाेण्याचा मार्ग माेकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:40+5:302021-01-02T04:16:40+5:30

औसा तालुक्यातील किल्लारी साखर कारखाना गत आठ वर्षांपासून बंद हाेता. दरम्यान, गुरुवारी नांदेड येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ...

Find a way to start Killari Sugar Factory | किल्लारी साखर कारखाना सुरू हाेण्याचा मार्ग माेकळा

किल्लारी साखर कारखाना सुरू हाेण्याचा मार्ग माेकळा

औसा तालुक्यातील किल्लारी साखर कारखाना गत आठ वर्षांपासून बंद हाेता. दरम्यान, गुरुवारी नांदेड येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी विवेकांनद देशमुख यांनी प्रवेशद्वाराला नारळ फाेडून टाळे उघडले. कारखाना सुरू करण्यासाठी दुरुस्तीला परवानगी देण्यात आली आहे. यावेळी कारखान्याचे अवसायक मंडळाचे संचालक उपस्थित हाेते. कारखान्याचे टाळे उघडण्यासाठी अवसायक मंडळ आणि कारखाना बचाव संघर्ष समितीला यश आले आहे. यावेळी दीपक पाटील यांच्या हस्ते मशनरीची पूजा करण्यात आली. यावेळी बाबा ऊर्फ केशव पाटील म्हणाले, किल्लारी साखर कारखान्यातील मशिनरी दुुरस्ती करून घेतली जाणार आहे. मार्च महिन्यात प्रत्यक्ष कारखाना सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कारखान्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पूर्वीपासूनच प्रेम आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. ज्ञानराज चाैगुले, सुरेशदाजी बिरादार यांनी पुढाकार घेत प्रयत्न केले आहेत.

यावेळी अवसायक मंडळाचे विजयकुमार साेनवणे, रमेश हेळंबे, विनाेद बाबळसुरे, विकास हराळकर, शिवाजी कदम, वामन पाटील, गुंडाप्पाअण्णा बिरादार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संताेष साेमवंशी, उपसभापती किशाेर जाधव, नानाराव भाेसले, बंकटराव पाटील, डाॅ. शंकराराव परसाळगे, डाॅ. नाेगजा, कारखान्याचे एमडी. टी. एन. पवार, सुरक्षा अधिाकरी शिवाजी माेरे, डाॅ. सचीन सगर, सतीश भाेसले गुरुजी, दत्ता भाेसले यांच्यासह शेतकरी, कर्मचारी उपस्थित हाेते.

ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले...

राज्य सहकारी बँकेचे अधिकारी विवेकानंद देशमुख म्हणाले, किल्लारी कारखाना सुरू करण्यासाठी आणि आतील यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात आली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी पुढेही मदत आणि सहकार्य राहणार आहे. याबाबत राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. अजित देशमुख यांचे अवसायक मंडळाला पत्र मिळाले आहे. सहकारमंत्र्यांसाेबत झालेल्या बैठकीत यंत्रणा दुरुस्ती आणि गाळपासाठी पनवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Web Title: Find a way to start Killari Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.