शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जळकोट येथील कनिष्ठ न्यायालयास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST

दि. २६ जून १९९ राेजी जळकोट तालुक्याला मंजुरी मिळाली हाेती. मात्र, तेव्हापासून येथील न्यायालयाचा प्रश्न प्रलंबित हाेता. न्यायालय व्हावे, ...

दि. २६ जून १९९ राेजी जळकोट तालुक्याला मंजुरी मिळाली हाेती. मात्र, तेव्हापासून येथील न्यायालयाचा प्रश्न प्रलंबित हाेता. न्यायालय व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात हाेता. मागणीचा रेटा वाढल्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयाने गेल्या दहा वर्षांपूर्वी आठवड्यातून एक दिवस ग्रामन्यायालय सुरू केले होते. मात्र तालुक्यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट हाेती. अनेकांना न्यायालयाच्या कामासाठी उदगीर आणि अहमदपूर येथे जावे लागत हाेते. याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटी-आगलावे, व्यापारी गोपाळकृष्ण गबाळे, मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गत महिनाभरापूर्वी भेट घेतली हाेती. यावेळी जळकोट येथे कायमस्वरूपी कनिष्ठ न्यायालय सुरू व्हावे, अशी मागणी केली होती. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जळकाेट येथील कनिष्ठ न्यायालयाला अखेर मंजुरी मिळाली आहे. परिणामी, जळकोट तालुक्यातील ४७ गावांतील नागरिकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदाेत्सव साजरा केला. जळकोटला कनिष्ठ न्यायालय मंजूर झाल्याचे वृत्त धडकताच बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, सरपंच शिरीष चव्हाण, गोपाळकृष्ण गबाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, जिल्हा परिषद सदस्य रुक्‍मीणबाई जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, नगरसेवक महेश शेटे, खादर लाटवाले, ॲड. श्याम गवळे, ॲड. तात्यासाहेब पाटील, ॲड. भगवान पाटील, फिरोज पटेल, ॲड. श्रीनिवास मंगनाळे, ॲड. टाकळे, ॲड. सूर्यवंशी, आदींनी आनंदाेत्सव साजरा केला.