शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

रॉंगसाईडने जाणाऱ्या कर्नाटक राज्याच्या बसने बाप-लेकास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 6:44 PM

accident near Ujani : अचानकपणे कर्नाटक राज्याची नांदेड-तालिकोट (केए २८, एफ २४५४) ही बस चुकीच्या दिशेने वेगात आली.

ठळक मुद्देशेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीकरून परतत होते बाप-लेक

उजनी (जि.लातूर) : चुकीच्या दिशेने कर्नाटक राज्याची नांदेड-तालिकोट ही बस वेगात येऊन दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार ( father-son were crushed by a Karnataka state bus) झाले. ही घटना औसा-तुळजापूर महामार्गावरील उजनी मोड येथे सोमवारी दुपारी २ वा.च्या सुमारास घडली. मयत बाप-लेक हे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातांगळी येथील आहेत.

हनुमंत माणिक जगताप (७०) व ज्ञानेश्वर हनुमंत जगताप (३०, रा.भातांगळी, ता.लोहारा, जि.उस्मानाबाद) असे मयत बाप-लेकाचे नाव आहे. भातांगळी येथील हनुमंत जगताप व ज्ञानेश्वर जगताप हे पिता-पुत्र सोमवारी औसा-तुळजापूर महामार्गावरील उजनी येथे शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकी (एमएच २५, झेड ४५३८) वरून आले होते. साहित्य खरेदी करून ते दुपारी गावाकडे मोटारसायकलवरून निघाले होते. ते उजनी मोड येथे आले असता, अचानकपणे कर्नाटक राज्याची नांदेड-तालिकोट (केए २८, एफ २४५४) ही बस चुकीच्या दिशेने वेगात आली. बसने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील पिता-पुत्र हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भादा ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व परिसरातील नागरिकांनी तत्काळ या दोघांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी दोघेही मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.

ज्ञानेश्वरचा तीन वर्षांपूर्वी विवाह...मयत ज्ञानेश्वर जगताप याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो पुण्यातील कंपनीमध्ये काम करीत होता. कोविडमुळे लॉकडाऊन झाल्याने तो गावी परतला होता. तो शेतीत वडिलांना मदत करीत असे, असे नातेवाइकांनी सांगितले.

बासुंदीसाठी थांबतात बसेस...उजनी मोड येथील बासुंदी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील बासुंदीचा आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी बहुतांश वाहने थांबतात. त्यामुळे बहुतांश बसेस या ठिकाणी थांबतात. दरम्यान, काही बस चालक व वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करतात.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूlaturलातूर