शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

उदगीर तालुक्याचे खरिपाचे एकूण ६६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उर्वरित २४ ...

उदगीर तालुक्याचे खरिपाचे एकूण ६६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उर्वरित २४ हजार हेक्टरवर तुरी सह अन्य खरीपाची पिके होती. यंदा सोयाबीनला आत्तापर्यंतचा विक्रमी भाव बाजारात मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीनची पीक घेण्याकडे दिसून येत आहे. बाजारात महाबीज कंपनीचे बियाणे मात्र गायब झाल्याचे दिसून येत आहे. अनुदानित बियाणांसाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागाकडून परमिट दिले जात असले, तरी प्रत्यक्षात दुकानदाराकडे बियाणे नसल्याचा अनुभव मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांना येत आहे. बियाणे टंचाई असल्याने शेतकऱ्यांना आता खासगी कंपन्यांच्या बियाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या दरात साधारणत: हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत फरक आहे. शेतकरी मशागतीची कामे, बी-बियाणे व खतांची खरेदी करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती असलेल्या डीएपी खताचा बाजारात तुटवडा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

तालुका कृषी विभागाचा प्रतिसाद नाही...

बियाणे व खते पुरवठ्यावर नियंत्रण करणारी कृषी यंत्रणा मात्र या काळात कुठेही प्रत्यक्षात पुढे आलेली नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कुणीही जबाबदार अधिकारी याबाबत बोलत नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क होत नसल्याचे चित्र आहे.

टोकण देऊनही होतेय गैरसोय...

तालुका कृषी विभागाच्या कार्यालयातून अनुदानित सोयाबीनचे २२८ बियाण्यांच्या वाणाचे परमिट देण्यात आले. यासाठी कार्यालयाने सांगितलेल्या दुकानात गेले असता त्यांनी टोकन घेऊन येण्याचे सांगितले. मागील दोन दिवसांपासून टोकन घेऊन मी दुकानदाराकडे चकरा मारत आहे. परंतु सदरील दुकानदार बियाणे देण्यास तयार नाही.- माधव विरकपाळे, शेतकरी, मोघा.

.

===Photopath===

090621\img-20210609-wa0004.jpg

===Caption===

शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणेसाठी धावपळ !महाबीजच्या बियाण्याला सर्वाधीक मागणी !