कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 14:42 IST2021-01-22T14:41:58+5:302021-01-22T14:42:25+5:30
शुक्रवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
बेलकुंड (जि. लातूर) : कर्ज व नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील चिंचोली (सोन) येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे.
नागनाथ भानुदास सरतापे (४०, रा. चिंचोली सोन, ता. औसा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत नागनाथ सरतापे यांना ८ एकर शेती आहे. त्यांच्यावर कर्ज होते. त्यातच शेतीतून चांगले उत्पादन मिळाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. यातून त्यांनी शुक्रवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास भादा पोलीस करीत आहेत.