खळबळजनक! लातुरात एका युवकाचा आढळला गटारीत मृतदेह
By राजकुमार जोंधळे | Updated: October 7, 2022 15:37 IST2022-10-07T15:37:02+5:302022-10-07T15:37:40+5:30
जुना औसा रोड परिसरातील घटना

खळबळजनक! लातुरात एका युवकाचा आढळला गटारीत मृतदेह
लातूर : शहरातील जुना औसा रोड परिसरात गटारीत एक युवकाचा मृतदेह आढळून असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील जुना औसा रोड परिसरात रामगीरनगर वासनगाव येथील युवक अनिल भाऊराव कांबळे (वय २५) हा गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. तो रात्री उशीरापर्यंत घरी परतलाच नाही. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह एका टपरीच्या पाठीमागील गटारीत आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन लातुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.