शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवेळी जेवणामुळे मूतखडा होण्याचा धोका; बाहेरचे खाद्य पदार्थ टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 20:00 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मानवी आजारांचे प्रमुख कारण आहे. अलिकडे मूतखड्याचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

लातूर : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मानवी आजारांचे प्रमुख कारण आहे. अलिकडे मूतखड्याचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अवेळी जेवण आणि बाहेरचे खाद्य पदार्थ खाणे, त्याशिवाय जेवणात मिठाचे प्रमाण अधिक असणे हे मूतखडा होण्याचे प्रमुख कारण असल्याचे डॉ. विद्यासागर बाहेती यांनी सांगितले. आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. या आजाराचे मानवी शरिरावर सातत्याने आक्रमण होत आहे. सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस योग्य आहार हे महत्त्वाचे आहे. अलिकडे मूतखड्याच्या आजाराने त्रस्त असणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ‘योग्यवेळी योग्य उपचार’ या पद्धतीचा वापर केला तर मूतखड्यासारख्या आजाराला आपण दूर ठेवू शकतो, असे मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. विद्यासागर बाहेती यांनी सांगितले. हा आजार एक वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला होऊ शकतो. पाठीत दुखणे, कळ मारून उलटी होणे, लघवीच्या वेळी जळजळ होणे, लघवीतून रक्त बाहेर पडणे आदी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे. मूतखड्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी महत्त्वाची आहे. यामुळे मूतखड्याच्या आजाराचे निदान होते. शिवाय, खड्याचे आकारमान समजण्यासाठी मदत होते. हा आजार टाळण्यासाठी बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत. त्याशिवाय जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात, वेळी-अवेळी जेवण करणे टाळावे, आहारामध्ये मिठाचे प्रमाण प्रमाणात असले पाहिजे. त्याशिवाय, पालक, मांसाहार, काजू, रताळे आणि सोडायुक्त शीतपेय टाळले पाहिजेत. अशा खाद्य पदार्थ व शीतपेयांपासून मूतखडा होण्याचा अधिक धोका असतो. हा आजार होऊ नये, यासाठी भरपूर प्रमाणात फळे खावीत. कॅल्शियमचे पदार्थ खाणे, मोसंबी, संत्र्याचे ज्यूस समप्रमाणात घ्यावे, दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे मूतखड्यासारखा आजार टाळता येईल, असेही डॉ. बाहेती म्हणाले.

समज आणि गैरसमज... मूतखडा या आजारासंदर्भात अनेक समज आणि गैरसमज आहेत. दुधामुळे मूतखडा होतो, याकडे लोकांनी लक्ष न देता डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. दुधामुळेच शरिराला कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर कॅल्शियमचा अभाव असेल, तरी देखील मूतखडा होऊ शकतो असेही डॉ. बाहेती म्हणाले.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य