शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Drought In Marathwada : खरीप गेल्याने रबीचा पेरा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:43 IST

दुष्काळवाडा : औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे.

- महेबूब बक्षी, शिवली, ता. औसा, जि. लातूर

औसा तालुक्यातील शिवली या गावचा शिवार काही भागात मुरमाड, तर काही ठिकाणी मध्यम प्रतीच्या जमिनीचा आहे. तालुक्याला दुष्काळ नवा नाही. यावर्षीही खरिपातून खर्च निघाला नाही. त्यामुळे रबीची पेरणी झालीच नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने काही ठिकाणच्या फळबागाही वाळून गेल्या आहेत. एकुणच दुष्काळ या तालुक्याची पाठ सोडायला तयार नाही. 

यावर्षी खरिपाचे केवळ १० टक्के उत्पादन झाले. उडीद, सोयाबीन, मूग या पिकांनी दगा दिला. पाण्याचे फारसे स्रोत नसल्याने रबीची पेरणी झाली नाही. जे बागायतदार शेतकरी आहेत, त्यांनाही मजुरी करण्याची वेळ आली आहे. शिवलीची लोकसंख्या ४ हजार ११४ आहे. २ हजार ४०० हेक्टरचा शिवार असून, पेरणीयोग्य क्षेत्र हे २ हजार २०२ हेक्टर्स आहे. खरिपात प्रामुख्याने ६९० हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही निघाला नाही. 

पाऊस नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रबीचा पेराही केला नाही. दरवर्षी या भागात शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात. केलेला खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकऱ्यांनी डाळिंब, पपई, आंबा, बोर, लिंबूच्या बागा लावल्या. मात्र, माळरानावर पाण्याअभावी फळबागा वाळत आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतातील उत्पादन घटले. परिणामी, अनेक शेतकरी मोलमजुरी करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 

सर्व पिके नष्ट झाली तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे़ पीक कापणीच्या तुलनेत खरिपातील पिकांचा उतारा ३० टक्क्यांनी घटला आहे़ पाण्याची स्थिती चिंताजनक आहे़ शिवली परिसरातील जमीन ही हलकी असल्याने येथील सर्व पिके नष्ट झाली आहेत़ त्याचबरोबर फळबागांचेही नुकसान झाले आहे़-एम़आऱ मोरे, तालुका कृषी अधिकारी

बळीराजा काय म्हणतो?मला २० एकर जमीन आहे. पाऊस चांगला असता तर जवळपास ६ लाखांचे उत्पादन होते. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीन पडीक पडली. शेतात सहा बोअर, दोन विहिरी असून त्या कोरड्याठाक आहेत. जनावरांना दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणतो. सोयाबीनच्या एका बॅगला दोन क्विंटलचे उत्पादन निघाले. खर्च १५ हजार, तर उत्पन्न ६ हजार झाल्याने रबीच्या पेरणीचा विषय आला नाही. -गुरुवीर महावीर क्षीरसागर

शेतीत काय निघाले, हे विचारल्यास काय सांगावे हेच कळत नाही. अगोदरच जमिनी हलक्या. पाऊस चांगला झाला तर खरीप हाताला येते. यावर्षी कोरडवाहू जमिनीचे जणू वाळवंटच झाले आहे. सोयाबीन काढताना काड हलके निघाले. बियाणेच भरले नसल्याने वाऱ्याचा त्रासही झाला. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. -सोमनाथ जयदेव क्षीरसागर

दरवर्षी भादा महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस पडतो. यावर्षी तर शेतातील खड्डेही भरले नाहीत. रिमझिम पावसाने पिके कशी तरी जगली. नंतर उघडीप दिल्याने हातचे पीक वाया गेले. पाऊसच नसल्यामुळे रबीची पेरणी अद्याप तरी झाली नाही. -किशोर इरपे

गावात ७० टक्के लोक शेती करतात. यावर्षी पाणीच नसल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही. शिवनी साठवण तलावाच्या पायथ्याशी माझी दहा एकर जमीन आहे. उत्पादन निघाले नसल्यामुळे आम्हा तिघा भावंडांनाही मोलमजुरी करावी लागत आहे. -असिफ शेख

काही आकडेवाडी : - लोकसंख्या : ४११४- मतदार : ३४००- हेक्टर्स गावचे भौगोलिक क्षेत्र : २४००- हेक्टर्स खरीप पेरणीयोग्य क्षेत्र : २२०२ - हेक्टर सोयाबीन : ७००- हेक्टर हायब्रीड : २२५- हेक्टर कापूस : ३५- हेक्टर तूर : ३१२- हेक्टर मूग : १५०- हेक्टर उडीद : ४०- हेक्टर फळबागा : १५८- औसा तालुक्यात यावर्षी झालेला पाऊस : ४४२.२२ मि.मी. 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस