शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांनो दंड भरलात का? अन्यथा...खटले होणार दाखल..!

By राजकुमार जोंधळे | Updated: November 23, 2022 17:49 IST

लातूर जिल्ह्यात वाहनधारकांकडे थकला दहा काेटींचा दंड 

- राजकुमार जोंधळेलातूर : जिल्ह्यातील वाहनधारकांना नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच अंगलट आले असून, ऑक्टाेंबरअखेर तब्बल १ लाख २ हजार २०४ वाहनधारकांवर एकूण २ लाख १६ हजार २७० ऑलाईन चालन फाडण्यात आले आहेत. यातून तब्बल ९ काेटी ५९ लाख ५४ हजार ९०० रुपयांचा दंड केला आहे. या दंडाच्या वसुलीसाठी पाेलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, वाहनधारकांकडून फारसा त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे समाेर आले आहे. वाहनधारकांनाे दंड भरलात का? अन्यथा... तुमच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे. याबाबत पाेलीस दलाकडून हालचाली सुरु आहेत.

‘काेराेना’मुळे माेठ्या प्रमाणावर वाहनधारकांकडे दंडाची रक्कम थकली आहे. या वसुलीसाठी त्या-त्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. शिवाय, वाहतूक शाखेच्या वतीनेही प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय लाेकअदालतमध्ये दंडाच्या थकबाकीपाेटी तडजाेड करण्याच्या सूचना, आदेश पाेलीस दलाकडून दिले जात आहेत. मात्र, वाहनधारकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे समाेर आले आहे. आता याबाबत ठाेस निर्णय घेण्याची शक्यता पाेलीस दलाकडून वर्तविली जात आहे. वाहनधारकांना दंडाची रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे. तर १२ नाेव्हेंबरराेजी लातूरसह जिल्ह्यातील तालुकास्तरावर झालेल्या राष्ट्रीय लाेकअदालत झाली. यापूर्वी संबंधित वाहनधारकांच्या माेबाइलवर मेसेज, एसएमएस पाठविण्यात आले हाेते. मात्र, या माेहिमेला वाहनधारकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे.

अनेकांवर केले खटले दाखल...माेटारवाहन कायद्यानुसार अनेक वाहनधारकांवर पाेलिसांनी खटले दाखल केली आहेत. एकाच वाहनावर दाेन-तीनदा केलेल्या दंडाची रक्कम थकली आहे. ही रक्क्म ५०० रुपयांपासून ५० हजारांच्या घरात आहे. दंडापाेटी करण्यात आलेल्या काेट्यवधींच्या वसुलीचे पाेलिसासमाेर माेठे आव्हान आहे.

दंड भरा अन्यथा कारवाई अटळ...ज्या वाहनांवर खटले आणि ऑनलाईन चलान फाडण्यात आले आहेत. अशांनी तातडीने संबंधित ठाण्यात, वाहतूक शाखेकडे अथवा थेट ऑनलाइन दंडाची रक्कम भरावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. - सुनिल बिर्ला, पाेलीस निरीक्षक, लातूर

 

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस