अक्का फाउंडेशन, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:03+5:302021-05-09T04:20:03+5:30
हे साहित्य जिल्हा प्रशासनाकडे उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्यामार्फत सुपुर्द करण्यात आले. माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार ...

अक्का फाउंडेशन, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण
हे साहित्य जिल्हा प्रशासनाकडे उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्यामार्फत सुपुर्द करण्यात आले. माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार निलंगा येथे ७, शिरूर अनंतपाळ येथे ३, देवणी येथे ३ व कासारशिरसी येथे २ असे आवश्यकतेनुसार वाटप करण्यात आले आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड अग्रिकल्चर, पुणे या संस्थेचे डायरेक्टर जनरल प्रशांत गिरबने यांच्या सहकार्याबद्दल स्वागत करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अरविंद पाटील निलंगेकर, उपजिल्हाधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आदी उपस्थित होते. भविष्यातील गरज ओळखून आ. संभाजी पाटील निलंगेकर हे आणखी २ कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहेत.
अक्का फाउंडेशनतर्फे उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वाॅर्डात तीन एलईडी संच तसेच कोविड रुग्णांच्या नातेवाइकांसाठी दररोज सकाळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी शुद्ध पाणीपुरवठा अक्का फाउंडेशनतर्फे करण्यात येत असल्याची माहिती अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली. कोरोना रुग्णांनी धीर सोडू नये. त्यांच्या नातेवाइकांनी काही अडचण असल्यास आक्का फाउंडेशनकडे संपर्क साधावा. कोणालाही औषध, ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.