अतनूर, बिबराळ गावांत दिवसाढवळ्या घरफाेडी

By राजकुमार जोंधळे | Updated: March 25, 2023 18:50 IST2023-03-25T18:49:50+5:302023-03-25T18:50:01+5:30

दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

Daylight housebreaking in Atanur, Bibaral villages | अतनूर, बिबराळ गावांत दिवसाढवळ्या घरफाेडी

अतनूर, बिबराळ गावांत दिवसाढवळ्या घरफाेडी

लातूर : जिल्ह्यातील अतनूर (ता. जळकाेट) आणि बिबराळ (ता. शिरुर अनंतपाळ) येथे दिवसाढवळ्या घर फाेडून साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम असा एकूण दोन लाख ४५ हजार ९६६ रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. याबाबत जळकाेट, शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात शुक्रवारी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी बाबूराव शामराव कदम (वय ६५, रा. अतनूर) यांच्या राहत्या घराचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले साेन्याचे नेकलेस, ३० ताेळे चांदीचे दागिने आणि राेख १५ हजार रूपये असा एकूण एक लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील हाणमंत भाऊराव जाधव (वय ४५, रा. बिबराळ) यांच्या घराचे कुलूप ताेडून अज्ञात चारेट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले दाेन ताेळ्यांचे साेन्याचे दागिने, राेख २० हजार असा एकूण ९७ हजार ९६६ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १९ मार्च राेजी घडली. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Daylight housebreaking in Atanur, Bibaral villages