अंधोरीत मटका, जुगारावर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:31+5:302021-06-28T04:15:31+5:30
... पिकांना जीवदान खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे रविवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. १५ ...

अंधोरीत मटका, जुगारावर धाडी
...
पिकांना जीवदान
खंडाळी : अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे रविवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले होते.
...
शिवसेनेच्या वतीने अंधाेरी येथे विविध उपक्रम
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधाेरी येथे शिवसेनेच्या वतीने कोविड योद्ध्यांचा गौरव, वृक्षारोपण आदी उपक्रम घेण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सपोनि. शैलेश बंकवाड, मुख्याध्यापक बी. डी. बिराजदार, डॉ. बालाजी गुद्दे, डॉ. बाळासाहेब बयास, विद्याभाऊ क्षीरसागर, अभियंता गंगाधर कल्याणे, विठ्ठल मंगे, बापूराव देवळकर, अहिल्याताई चिल्केवार, यशोदा कांबळे, प्रभावतीताई कांबळे, मनोज कांडनगिरे, प्रवीण डांगे, सागर खानापुरे, अमर वाघमारे, बाबूराव चिल्केवार, चंद्रकांत डिगे, सिद्धेश्वर फुलारी, पुंडलिक कावळे, निवृत्ती ब्रिगंणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी सरपंच प्रदीप चौकटे यांच्या हस्ते पक्ष ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच कोविड योद्ध्यांचा सत्कार करून वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक प्रदीप चौकटे यांनी केले. आभार तलाठी दिंगबर मेडके यांनी मांडले. यशस्वीतेसाठी श्यामकांत उदगिरे, संजय गायकवाड, मोहन कासले यांनी परिश्रम घेतले.