उसात गांजाची लागवड उघड; दहा लाखांच्या गांजासह शेतकरी अटकेत
By राजकुमार जोंधळे | Updated: October 12, 2022 18:20 IST2022-10-12T18:20:05+5:302022-10-12T18:20:35+5:30
खबऱ्याने चाकूर तालुक्यातील डाेंग्रज शिवारात एका शेतकऱ्याने उसात गांजाची लागवड केल्याची माहिती दिली.

उसात गांजाची लागवड उघड; दहा लाखांच्या गांजासह शेतकरी अटकेत
उदगीर (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील डाेंग्रज शिवारात उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याला उदगीर ग्रामीण पाेलिसांनी अटक केली असून, तब्बल १० लाख १ हजार ६९९ रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई ११ ऑक्टाेबर राेजी उदगीर येथील विशेष पथकाने केली आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन,उदगीर येथील उपविभागीय पाेलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण ठाण्याचे पाेलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांना खबऱ्याने चाकूर तालुक्यातील डाेंग्रज शिवारात एका शेतकऱ्याने उसात गांजाची लागवड केल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे उदगीर येथील पाेलीस पथकाने डाेंग्रज येथील शेतकरी दशरथ रामचंद्र कांबळे यांच्या शेतात पाेलिसांनी छापा मारला. यावेळी उसात गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. ही कारवाई मंगळवार, ११ ऑक्टाेबर राेजी पथकाने केली. त्याने उसाच्या शेतीत गांजाची ४४ झाडे लावल्याचे समाेर आले. गांजाच्या झाडाची घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, त्याचे वजन १०९ किलाे (किंमत १० लाख १ हजार ६१९ रुपये) आहे. याबाबत शेतकरी दशरथ रामचंद्र कांबळे (वय ४७ रा. डाेंग्रज ता. चाकूर) याला अटक करण्यात आले. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे,तानाजी चेरले,पोलीस अमलदार रमेश कांबळे,राम बनसोडे,सखाराम भिसे,सिद्धेश्वर स्वामी, कृष्णा पवार,तुळशीराम बरुरे,राहुल गायकवाड,नामदेव चेरले,शिवदास बोईनवाड,गंगाधर साखरे,नजीर शेख यांच्या पथकाने केली आहे.