शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल; पेरा ३ लाख हेक्टरवर, विमा ४ लाख २९ हजार हेक्टरचा

By हरी मोकाशे | Updated: December 25, 2023 13:12 IST

यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.

लातूर : पीकविम्याच्या रकमेचा शेतकऱ्यांवर अधिक भार पडू नये म्हणून शासनाने केवळ एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. चालू रब्बी हंगामात ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला असला तरी प्रत्यक्षात पीकविमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे एक रुपयाच्या पीकविम्याची कमाल अन् रब्बी हंगामाच्या क्षेत्रवाढीची धमाल झाली आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीइतका पाऊस झाला नाही. परिणामी, नदी-नाले वाहिले नाहीत. ओढेही खळाळले नाहीत. मध्यम प्रकल्पासह तलाव, विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पेरा कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, त्यापेक्षा अधिक प्रमाणात पेरा झाला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८० हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून, तो २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टर झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. यंदापासून शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ एक रुपया केल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचापीक - पेरा (हेक्टरमध्ये)ज्वारी - ३२५५७गहू - ८९६२मका - १५८१हरभरा - २७१४६२करडई - १६०८३जवस - ९९सूर्यफूल - ४५एकूण - ३३१६३०

५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी भरला विमाजिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार १३८ शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा, ज्वारी अणि गहू या तीन पिकांचा हप्ता भरला आहे. विमा रकमेपोटी ५ लाख ३६ हजार १३६ रुपयांचा भरणा करीत ४ लाख २९ हजार ९९ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण केले आहे. शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी राज्य शासन ९२ कोटी ९१ लाख ११ हजार ९५३ रुपयांचा भरणा करणार आहे. तसेच केंद्र शासनाला ७० कोटी २ लाख ८ हजार ९०७ रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

एक लाख हेक्टरची तफावतजिल्ह्यात रब्बीतील सात पिकांची एकूण ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर पेरणी झाली असली तरी केवळ तीन पिकांचा विमा ४ लाख २९ हजार ९९ हेक्टरचा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे १ लाख १६ हजार ११८ हेक्टर क्षेत्राची तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागासही धक्काच बसला आहे. दरम्यान, अंतिम पेरणी अहवालानंतर नेमके पेरणी क्षेत्र समजेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

कृषी विभागही गोंधळातजिल्ह्यात पेरणीच्या तुलनेत १ लाख १६ हजार हेक्टरवर अधिक पीकविमा उतरविण्यात आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयही गोंधळात पडले आहे. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे म्हणत कानावर हात ठेवले.

अवकाळी पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढलेअल्प पर्जन्यमानामुळे जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करण्याचे टाळले होते. दरम्यान, अवकाळी पाऊस झाल्याने पेरणी केली. तसेच ऊस कारखान्यास गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडून रब्बीचा पेरा केला. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र