चाकुर येथे शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या; आरोपी फरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:03 IST2018-06-18T13:03:25+5:302018-06-18T13:03:25+5:30

तालुक्यातील बोथीतांडा येथील सुनील जाधव व रामचंद्र जाधव या सख्या चुलत भावात शेतीच्या कारणावरून वाद होते.

Cousin killed in farm land issue; The accused absconded | चाकुर येथे शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या; आरोपी फरार 

चाकुर येथे शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या; आरोपी फरार 

चाकूर (लातूर) : तालुक्यातील बोथीतांडा येथील सुनील जाधव व रामचंद्र जाधव या सख्या चुलत भावात शेतीच्या कारणावरून वाद होते. या वादातूनच आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास रामचंद्र याने सुनीलवर चाकूने वार करत त्याची हत्या केली. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, रामचंद्र जाधव हा पुणे येथे राहतो. एका विवाह समारंभासाठी तो गावी आला. रविवारी रात्री शेतीच्या जुन्या वादावरून सुनील व रामचंद्र यांच्यात बाचाबाची झाली. यातच आज सकाळी पुन्हा पैश्याच्या व्यवहारावरून दोघात वाद झाले. त्यावेळी रामचंद्रने सुनीलवर चाकूने वार करत त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक पोलिस निरिक्षक रामेश्वर तट यांनी घटनास्थळास भेट दिली. सुनील जाधव यांची उत्तरणीय तपासणी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. घटनेनंतर रामचंद्र फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथक घेत आहेत. 

Web Title: Cousin killed in farm land issue; The accused absconded