CoronaVirus : दिलासादायक ! लातूर जिल्ह्यातील ७ कोरोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:06 PM2020-04-18T17:06:31+5:302020-04-18T17:07:11+5:30

यातील एक अहवाल प्रलंबित

CoronaVirus: Comfortable! First test of 7 Corona obstruction in Latur district negative | CoronaVirus : दिलासादायक ! लातूर जिल्ह्यातील ७ कोरोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह

CoronaVirus : दिलासादायक ! लातूर जिल्ह्यातील ७ कोरोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देआंध्रप्रदेशच्या ८ यात्रेकरूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

लातूर : जिल्ह्यात स्थानिकांना कोरोना बाधा नाही, मात्र निलंगा मुक्कामी राहिलेल्या आंध्रप्रदेशच्या ८ यात्रेकरूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातील ७ जणांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. १ अहवाल प्रलंबित आहे. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर म्हणाले, बाधित ८ जणांचा क्वारंटाईन कालावधी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाला असून सर्वांची पहिली चाचणी करण्यात आली त्यात ७ अहवाल प्राप्त असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. १ प्रलंबित आहे. तसेच सर्वांची आणखी एक चाचणी होईल त्यानंतर कोरोना अहवाल अंतिम जाहीर होईल. तूर्त ७ अहवाल निगेटिव्ह आले ही दिलासादायक बातमी आहे.

Web Title: CoronaVirus: Comfortable! First test of 7 Corona obstruction in Latur district negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.