coronavirus : लातूरमध्ये आणखी एक कोरोनाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:52 IST2020-06-30T16:51:48+5:302020-06-30T16:52:09+5:30

औसा तालुक्यातील सारोळा येथील एका ६४ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू

coronavirus: Another coronavirus patients death in Latur | coronavirus : लातूरमध्ये आणखी एक कोरोनाचा बळी

coronavirus : लातूरमध्ये आणखी एक कोरोनाचा बळी

लातूर : औसा तालुक्यातील सारोळा येथील कोरोनाबाधित एकाचा २९ जून रोजी रात्री उशिरा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाचा जिल्ह्यातील हा १७ वा बळी आला.

औसा तालुक्यातील सारोळा येथील एका ६४ वर्षीय कोरोना बाधित रुग्णास २५ जून रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. शिवाय, दमा आजारही होता. उपचारादरम्यान २९ जून रोजी रात्री उशिरा या रुग्णाचा मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ३३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी २०० रुग्ण बरे झाले असून, सध्या ११८ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे,  जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

Web Title: coronavirus: Another coronavirus patients death in Latur