coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 18:33 IST2020-07-05T18:33:24+5:302020-07-05T18:33:48+5:30

हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा २२ वा कोरोनाचा बळी ठरला आहे.

coronavirus: Another coronavirus patient death in Latur district | coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा बळी

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा बळी

लातूर : उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ७४ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. हा जिल्ह्यातील २२ वा कोरोनाचा बळी ठरला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४२४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, यातील २३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १७३ रुग्णांवर जिल्ह्या विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने बाधा पसरणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाधित क्षेत्रावर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे. या बाधित क्षेत्रामध्ये सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांच्या नोंदी करून उपचार केले जात आहेत. प्रत्येक नागरिकांच्या रक्तामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण तसेच पल्सरेट याबाबतची तपासणी केली जात आहे.

Web Title: coronavirus: Another coronavirus patient death in Latur district