coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखीन २७ रूग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:02 IST2020-07-06T23:02:09+5:302020-07-06T23:02:58+5:30

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २१३ आहे.

Coronavirus : Another 27 patients tested positive in Latur district | coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखीन २७ रूग्ण पॉझिटिव्ह

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखीन २७ रूग्ण पॉझिटिव्ह

ठळक मुद्देआतापर्यंत २७० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लातूर : जिल्ह्यात सोमवारी आणखीन २७ कोरोनाचे रूग्ण आढळले असून, आता बाधितांचा आलेख पाचशेवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २१३ आहे. आतापर्यंत २७० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत सोमवारी १८० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १५ अहवाल अनिर्णीत असून, ७ जणांचे स्वॅब परिपूर्ण नसल्याने रद्द करण्यात आले आहेत.

सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये व्हीडीजीआयएमएस संस्थेअंतर्गत १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उदगीर तालुक्यातील ३, लातूर महानगरपालिकेअंतर्गत ३, अहमदपूर तालुक्यातील ३, निलंगा येथील १, लातूर एमआयडीसी कोविड केंद्रातून ४ तर देवणी तालुक्यात १ अशा एकूण २७ जणांचा समावेश असल्याची माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

Web Title: Coronavirus : Another 27 patients tested positive in Latur district