coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:55 IST2020-05-21T20:55:27+5:302020-05-21T20:55:59+5:30

सदरील पाचही जण मुंबई येथून आलेले अथवा मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील

coronavirus: 5 more positive patients in Latur district | coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

लातूर : गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील ८१ अहवाल रात्री ८.३० वाजेपर्यंत प्रलंबित आहेत.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील पानगावचा १, लातूर तालुक्यातील बोरगाव काळे १, उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी १, निलंगा तालुक्यातील लांबोटा व कोराळी येथील प्रत्येकी १ असे एकूण ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सदरील पाचही जण मुंबई येथून आलेले अथवा मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ७१ वर पोहोचला आहे. त्यातील ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ३३ जणांवर लातूर, निलंगा, उदगीर येथे उपचार सुरू आहेत. तर प्रारंभी दोन जणांचा मृत्यू झालेला आहे.

Web Title: coronavirus: 5 more positive patients in Latur district