coronavirus : लातूर जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:17 IST2020-07-04T23:17:18+5:302020-07-04T23:17:46+5:30

जिल्ह्यात बाधितांची संख्या ४२४ वर पोहोचली आहे.

coronavirus: 16 positive in Latur district; Death of one | coronavirus : लातूर जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

coronavirus : लातूर जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

लातूर : कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात शनिवारी आणखी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ४२४ वर पोहोचली आहे. दरम्यान, अहमदपूर येथील एका बाधिताचा सायंकाळी मृत्यू झाला आहे.

मृतांची संख्या २१ वर पोहोचली आहे. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिवसभरात २३६ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अहवाल आले असून, त्यात १६ पॉझिटिव्ह तर १९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, १३ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर, विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंडे यांनी दिली. आतापर्यंत २३८ जणांना सुटी देण्यात आली आहे.

Web Title: coronavirus: 16 positive in Latur district; Death of one