शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या तक्रारींबाबत ग्राहक अनभिज्ञ; वर्षभरात वैधमापन विभागाकडे एकही तक्रार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल टाकताना मापात माप करणाऱ्यांवर वैधमापन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल टाकताना मापात माप करणाऱ्यांवर वैधमापन विभागाची करडी नजर आहे. मात्र पेट्रोल-डिझेलबाबत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत ग्राहक अनभिज्ञ आहेत. परिणामी, जिल्ह्यात वर्षभरात पेट्रोल-डिझेलबाबत वैधमापन शास्त्र विभागाकडे एकही तक्रार दाखल झालेली नाही.

जिल्ह्यात जवळपास १४० पेट्रोलपंप आहेत. दररोज ४ लाख लिटर्स पेट्रोल, तर ११ लाख लिटर्स डिझेलची विक्री होते. कोरोनामुळे ही विक्री २० ते २५ टक्क्यांनी घटली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने थेंबन्‌ थेंब किंमतीचा झाला आहे. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल टाकताना ग्राहक म्हणावे तसे लक्ष देत नाहीत. परिणामी, त्यांची फसवणूक होते. मात्र तक्रार कोणाकडे करावी, याबाबत माहिती नसल्याने कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे वैधमापन शास्त्र विभाग कार्यान्वित असून, जनजागृतीची गरज आहे.

पेट्रोल पंपावर प्रत्येक ग्राहकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. काही गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करता येऊ शकते. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते.

वैधमापन शास्त्र विभागाच्यावतीने वर्षातून एकवेळेस पेट्रोलपंपाची तपासणी होते. वर्षभरात एकही तक्रार नाही. ग्राहकांकडून गर्दीत लवकर पेट्रोल टाकण्याच्या प्रयत्नात झिरो बघण्याकडे दुर्लक्ष होते. याबाबत जागरुकता आवश्यक आहे.

पेट्रोल-डिझेल वगळता इतर प्रकरणांच्या तक्रारी वैधमापन विभागाकडे दाखल आहेत. त्याबाबत कार्यवाही केली जात आहे.

वैधमापन शास्त्र विभागाच्यावतीने वर्षातून एकवेळेस जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंपांची तपासणी केली जाते. ग्राहकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणीही केली जाते. जिल्ह्यात वर्षभरात पेट्रोल-डिझेलबाबत एकही तक्रार दाखल झालेली नाही.

- सतीश अभंगे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, लातूर/उस्मानाबाद