नाले सफाईसाठी काँग्रेसचे चाकुरात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:56+5:302021-06-16T04:27:56+5:30
या आंदोलनात विलासराव पाटील, गंगाधर केराळे, सीताराम मोठेराव, भागवत फुले, शेख हुसेन पप्पुभाई, सलिम तांबोळी, सचिन चाकूरकर, बाळू इरवाने, ...

नाले सफाईसाठी काँग्रेसचे चाकुरात धरणे आंदोलन
या आंदोलनात विलासराव पाटील, गंगाधर केराळे, सीताराम मोठेराव, भागवत फुले, शेख हुसेन पप्पुभाई, सलिम तांबोळी, सचिन चाकूरकर, बाळू इरवाने, गफुर मासुलदार, कैलास मोठेराव, शंकर मोरे, रणजित पाटील शेगावकर, सुमनबाई महालिंगे, वच्छला महालिंगे, पंचशीलाबाई महालिंगे, अन्नपूर्णाबाई महालिंगे, कोंडाबाई शिंदे, अनिल महालिंगे, बशीर मासुलदार, शेरु मासुलदार, मनोज सोमवंशी, रवी नाईकवाडे, तौसिफ शेख, दिनेश फुले, किशोर मोरे, कपिल माने, विनोद फुले, धनजंय झांबरे, अशोक मोठेराव, बाळू महालिंगे, चेतन महालिंगे, अहमद कुरैशी, मुस्सा कुरैशी, इस्माईल कुरैशी, अयाज मणियार, आदम सय्यद, गफार सय्यद, कलीम सय्यद, मुस्सा कोतवाल, अझहर सौदागर, प्रदीप महालिंगे, सुजित महालिंगे, बलभीम महालिंगे, इंद्रजित महालिंगे, किशोर धनेश्वर, प्रशांत गायकवाड, सतीश गायकवाड, विश्वनाथ कांबळे, शुभम गायकवाड, सौरभ गायकवाड, सचिन गायकवाड, सचिन मोठेराव, निखिल मोठेराव, वासुदेव लोंढे यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिल कांबळे, फड यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनामुळे सफाईस सुरुवात...
शहरातील उजळंब रोडवरील बोथी रोड ते लक्ष्मीनगरपर्यंत दोन्ही नाल्या तुंबल्यामुळे पावसाचे पाणी घरात जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांनी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्याकडे समस्या मांडली होती, तसेच नाल्यांची सफाई करण्याच्या मागणीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागास निवेदन देण्यात आले होते; परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती.
त्यामुळे या भागातील संतप्त नागरिकांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सुरू होताच बांधकाम विभागाने यंत्राच्या साहाय्याने नाल्यांची सफाई करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.