शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर, तर स्नेहल उटगे उपमहापौरपदी बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:14 IST

वंचितच्या माघारीने पेच सुटला! लातूर महापालिकेत काँग्रेस-वंचित युतीची बिनविरोध सत्ता.

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा पेच अखेर सुटला असून, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौरपदी, तर ॲड. स्नेहल उटगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने शेवटच्या क्षणी आपले उमेदवार मागे घेतल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

निवडीचा घटनाक्रमसोमवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. पीठासन अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सुरुवातीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सत्तेच्या वाटपावरून पेच निर्माण झाला होता. मात्र, चर्चेअंती तो यशस्वीरीत्या सोडवण्यात आला.

‘वंचित’ची माघार आणि सत्तेचा फॉर्म्युलानिवडणूक पूर्व आघाडीनुसार काँग्रेसचे ४३ आणि वंचित बहुजन आघाडीचे ४ उमेदवार निवडून आल्याने या युतीचे सभागृहात स्पष्ट बहुमत होते. मात्र, सत्तेत योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘वंचित’ने सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केले होते.समझोता : पुढील अडीच वर्षांच्या टर्ममध्ये उपमहापौरपद वंचित बहुजन आघाडीला देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, वंचितने आपले अर्ज मागे घेतले. यामुळे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.

राजकीय बलाबलपक्ष नगरसेवक संख्याकाँग्रेस ४३भाजप २२वंचित बहुजन आघाडी ०४राष्ट्रवादी काँग्रेस ०१

जल्लोषात पदभार स्वीकारलानिवडीची अधिकृत घोषणा होताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. अभिनंदनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर जयश्री सोनकांबळे आणि ॲड. स्नेहल उटगे यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव आणि वंचितचे मराठवाडा सचिव संतोष सूर्यवंशी यांनी आघाडी कायम असल्याची अधिकृत घोषणा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Wins Latur Municipal Corporation; Mayor & Deputy Mayor Elected Unopposed

Web Summary : Congress's Jayashree Sonkamble elected Latur Mayor, Snehal Utge Deputy Mayor unopposed. Vanchit Bahujan Aghadi withdrew candidates, solidifying Congress's win. Agreement ensures future Deputy Mayor position for Vanchit Bahujan Aghadi.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६laturलातूरcongressकाँग्रेस