विद्युत रोहित्र नादुरुस्तीच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:38+5:302020-12-30T04:26:38+5:30
राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळावा लातूर : भारतीय मराठा महासंघ व शिवश्री प्रतिष्ठान सोलापूर आणि सकल मराठा वधू-वर सूचक ...

विद्युत रोहित्र नादुरुस्तीच्या तक्रारी
राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळावा
लातूर : भारतीय मराठा महासंघ व शिवश्री प्रतिष्ठान सोलापूर आणि सकल मराठा वधू-वर सूचक केद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी २०२१ रोजी पत्रकार भवन पंचायत समिती शेजारी लातूर येथे दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सहभागी होण्याचे आवाहन माणिकराव निंबाळकर, पंजाबराव वडजे-पाटील, रामराव शिंदे, निवृत्ती जाधव, राजेंद्र चौधरी, सारिका पाटील, सुदाम शिंदे यांनी केले आहे.
शाळांतील उपाययोजनांची केली पाहणी
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे उपाययोजनांचे पालन करीत माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना भेटी देण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यानुसार लातूर शहरासह ग्रामीण भागातील नववी ते दहावीचे वर्ग सुरू असलेल्या शाळांना भेटी देऊन मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी केली जात आहे.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. ज्या रुग्णांकडे सुविधा आहेत, अशांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे. या रुग्णांवर स्थानिक डॉक्टरांचा वॉच आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने होम आयसोलेशनसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आता सध्या केवळ ३०९ जणांवर उपचार सुरू असून, जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ५३६ दिवसांवर पोहोचला आहे.
दयानंद फार्मसीमध्ये व्याख्यानाचे आयोजन
लातूर : शहरातील दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये क्लिनिकल ट्रायल्स तसेच नोकरीमधील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी केले. यावेळी मार्गदर्शक संजय यांनी फार्मसी क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापकांची उपस्थिती होती.
शरद गोरे यांची शाखा प्रमुखपदी निवड
लातूर : राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या एमआयडीसी शाखा प्रमुखपदी शरद गोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल नल्ले, कपिल बरूरे, सुनील कांबळे, नरेंद्र लासे, टेकाळे, जाधव, अनिल घोडके, विशाल शिंदे, योगेश गंभिरे, मिन्हाज सय्यद, रहेमान शेख आदींसह राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
तुषार ठिबक सिंचनाचा वापर वाढला
लातूर : जिल्ह्यात रबी पिकांना तुषार ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी साठा असल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्यासाठी तुषार ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारला जात आहे.
कृषी विभागातर्फे हरभरा पिकाची कार्यशाळा
लातूर : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने विविध ठिकाणी हरभरा पीक कार्यशाळा घेतली जात आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, गहू, रबी ज्वारी आदी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फवारणी करणे गरजेचे बनले असून, कार्यशाळेत पीक नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी गर्दी
लातूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. तीन दिवसांच्या सुट्यांमुळे सोमवारी तहसील कार्यालय, महा-ई सेवा केंद्रावर गर्दी पहायला मिळाली. जिल्ह्यात ४०८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारची अंतिम तारीख आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सध्या ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहत आहेत.
बाबासाहेब गायकवाड यांचा निवडीबद्दल सत्कार
लातूर : काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग लातूर जिल्हाध्यक्षपदी ॲड. बाबासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, अशोकराव काळे, महेंद्र भादेकर, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. समद पटेल, पंडित कावळे, सचिन दाताळ आदींसह काँग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
श्रीकांत क्रिकेट ॲकॅडमीचे स्पर्धेत यश
लातूर : शहरात झालेल्या टी-२० चषक स्पर्धेत श्रीकांत क्रिकेट ॲकॅडमीच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. यावेळी आ. अभिमन्यू पवार, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश बियाणी, सुरेश जैन, शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, अभिजीत देशमुख, दीपक मठपती, विशाल जाधव, रणजीतसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.
सहायक कक्ष अधिकारी आव्हाड यांचा सत्कार
लातूर : शालेय शिक्षण विभागाचे सहायक कक्ष अधिकारी पी.एम. आव्हाड हे लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांचा राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या वतीने प्राचार्य डी.एन. केंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एम.के. देशमुख, एल.व्ही. सावंत, राजेंद्र जायभाये आदींसह प्राध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.