शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

NEET Paper Leak: लातुरात काेचिंग क्लासच्या सराव परीक्षेतील ४२ प्रश्न सारखे; पालकाची तक्रार

By राजकुमार जोंधळे | Updated: May 13, 2026 00:09 IST

लातुरात ‘नीट’ पेपरफुटीच्या अनुषंगाने चाैकशीचे दिले आदेश

लातूर : शहरातील एका काेचिंग क्लासने घेतलेल्या ‘नीट’ परीक्षापूर्व सराव परीक्षेतील एकूण ४२ प्रश्न सारखे (समान) असल्याची तक्रार एका विद्यार्थिनीच्या पालकाने मंगळवारी रात्री नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे यांच्याकडे प्रत्यक्ष हजर राहून केली आहे. याबाबत पाेलिस अधीक्षकांनी तातडीने चाैकशीचे आदेश दिले आहेत.

पाेलिस प्रशानाने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. रविवार, वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिटी एन्टरन्स टेस्ट) घेण्यात आली हाेती. नीट-२०२६ पेपरफुटीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीमध्ये पोलिस अधीक्षकांनी तातडीने चाैकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवार, १२ मे २०२६ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे एका विद्यार्थिनीचे पालक यांनी प्रत्यक्ष हजर हाेऊन ही तक्रार दिली आहे. तक्रारीत पालकाने म्हटले आहे, की नीट-२०२६ चा पेपर होण्यापूर्वी लातूर येथील एका काेचिंग क्लास चालकाने एक मॉक टेस्ट पेपर त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना दिला हाेता. त्या पेपरमधून ४२ प्रश्न हे नीट (यूजी) २०२६ या पेपरमध्ये जशाच्या तसे (समान) आलेले होते. दरम्यान, मंगळवारी ‘नीट’ची झालेली परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने लातूर येथील एका काेचिंग क्लासेसचा या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये समावेश असल्याची शक्यता तक्रारीमध्ये पालकाने नमूद केली आहे.

या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर शहराचे डीवायएसपी समीरसिंह साळवे यांना सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करून दोषीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Coaching Class Test Matches 42 Questions; Parent Complains

Web Summary : A parent in Latur alleges 42 questions from a coaching class's mock NEET exam matched the actual test. Police are investigating the paper leak complaint.
टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकlaturलातूर