लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
By राजकुमार जोंधळे | Updated: June 12, 2025 06:00 IST2025-06-12T05:59:31+5:302025-06-12T06:00:02+5:30
Latur News: अवघ्या पाच वर्षाचा लहान मुलगा औसा राेड परिसरात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकटाच फिरत असल्याचे आढळून आले. दीपक ढाेबळे यांनी सतर्कता दाखवत त्याला विचारणा केली. ताे वडिलांच्या शाेधात फिरत असल्याचे समजले. यावेळी प्रारंभी त्यांनी शाेधाशाेध केली. त्यानंतर डायल ११२ वर काॅल करुन माहिती दिली.

लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
-राजकुमार जाेंधळे
लातूर - अवघ्या पाच वर्षाचा लहान मुलगा औसा राेड परिसरात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एकटाच फिरत असल्याचे आढळून आले. दीपक ढाेबळे यांनी सतर्कता दाखवत त्याला विचारणा केली. ताे वडिलांच्या शाेधात फिरत असल्याचे समजले. यावेळी प्रारंभी त्यांनी शाेधाशाेध केली. त्यानंतर डायल ११२ वर काॅल करुन माहिती दिली. शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासानंतर मुलाला पालकाकडे सुपूर्द करण्यात आले.
लातुरातील औसा राेड भागात राहणारे अमाेल ढवळे हे बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, मुलगाही वडिलाच्या मागे निघाला. वडिलांना मुलगा हरवल्याची माहिती घराकडून मिळाली. त्यांनीही शाेधा-शाेध केली. इकडे औसा राेड परिसरात मुलगा एकाच फिरत असल्याचे स्थानिक नागरिक दीपक ढाेबळे यांना आढळून आले. त्यांनी तातडीने मुलाला जवळ घेत नाव, गाव, पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. मुलाचा फाेटाे काढून समाज माध्यमावर व्हायरल करत संपर्क साधण्याचे आवाहन केले. तर डायल ११२ वर काॅल करुन लहान मुलगा एकटाच फिरत असल्याची माहिती दिली. अवघ्या दहा मिनिटात शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस काॅन्स्टेबल नामदेव राठाे, पाेलिस काॅन्स्टेबल जिशान शेख हे औसा राेड येथे दाखल झाले. त्यांनी मुलाला ताब्यात घेत, मुलाचा फाेटाे पाेलिसांच्या ग्रुपवरही व्हायरल केला. मुलाच्या आई-वडिलांचा शाेध घेणे सुरु झाले. दरम्यान, तिकडे वडिल अमाेल ढवळे हे मुलगा हरवला म्हणून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बुधवारी रात्री १० वाजता धडकले. पाेलिसांनी आधीच पालकांची शाेधा-शाेध सुरु केली हाेती. पाेलिसांनी मुलाची भेट घालून दिल्यानंतर पालक अमाेल ढवळे यांचा जीव भांड्यात पडला. पाच वर्षाचा देवांश हरवला, नागरिक दिपक ढाेबळे यांनी प्रसंगावधानता दाखवत सतर्कता दाखवल्याने अवघ्या अडीच तासात मुलाला पालकाच्या स्वाधीन करता आहे.
शाेधाशाेध केली अन् पालकाचा शाेध लागला...
डायल ११२ वर काॅल आला आणि आम्ही घटनास्थळी दहाव्या मिनिटात दाखल झाला. मुलाला ताब्यात घेत पाेलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पालकाचा शाेध घेण्यास सुरुवात केली. तिकडे शाेध घेत असलेले पालक तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले. मुलगा आणि पालकाची भेट झाली. अडीच तासानंतर मुलाला कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आले. - नामदेव राठाेड, पाेकाॅ, लातूर