पोउपनि अनिल मुळे आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:21+5:302021-08-18T04:26:21+5:30
निवेदनात म्हटले आहे, अमरावती येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक मानसिक त्रास दिला आहे. त्यांची वेतनवाढ रोखून बढतीला अडथळा निर्माण ...

पोउपनि अनिल मुळे आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करा
निवेदनात म्हटले आहे, अमरावती येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक मानसिक त्रास दिला आहे. त्यांची वेतनवाढ रोखून बढतीला अडथळा निर्माण केला. १३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्यानंतर त्याच रात्री मुळे यांच्या निवासस्थानी बेकायदेशीरपणे जाऊन त्यांचे लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक ते जप्त केले आहे. त्यातील सर्व पुरावे नष्ट केले असून, लॅपटॉपशी छेडछाड करण्यात आली आहे. असा आराेपही करण्यात आला आहे. या प्रकरणातील दाेषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या मोबाईलची सर्व माहिती आणि सीडीआर तपासावे, त्यांनी आत्महत्या केली असली तरी त्यांचा घातपात, खून असुू शकतो. याचीही कसून चौकशी करण्यात यावी, अनिल मुळे यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीर बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, कुणाल बागबंदे, अमोल निडवदे, उदयसिंह ठाकूर, नागेश अष्टुरे, श्रीकांत पाटील, राजकुमार बिरादार बामणीकर, तोंडार येथील उपसरपंच नीळकंठ बिरादार, आनंदराव मालोदे, माधव पाटील, माधव पटवारी, शिवकुमार पांडे, विलास खिडे, शिवलिंग हैबतपुरे, संदीप बिरादार आदींची नावे आहेत.