चिमुकलीचा विनयभंग, ६० वर्षीय वद्धाला अटक; किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: June 11, 2023 23:16 IST2023-06-11T23:16:27+5:302023-06-11T23:16:48+5:30
पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राजपूत करत आहेत.

चिमुकलीचा विनयभंग, ६० वर्षीय वद्धाला अटक; किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
किल्लारी (जि. लातूर) : एका साठ वर्षीय वृद्धाने पाच वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना औसा तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात वृद्धाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आराेपीला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील एका गावात रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास गल्लीतच राहणाऱ्या साठ वर्षीय वृद्धाने पाच वर्षीय चिमुकलीला चाॅकलेट देण्याचे आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. शिवाय, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात गुरनं. १४४ / २०२३ कलम २५४ भादंवि सहकलम ८, १२ बाललैंगिक आत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राजपूत करत आहेत.