लातुरात विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !
By राजकुमार जोंधळे | Updated: September 27, 2023 18:55 IST2023-09-27T18:55:10+5:302023-09-27T18:55:28+5:30
श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी एकूण ६५ ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.

लातुरात विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !
लातूर : आपल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिवणुकीची जय्यत तयारी केली आहे. गुरवारी निघणाऱ्या विसर्जन मिवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. याबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बुधवारी सांयकाळी दिली.
लातूर शहरासह जिल्ह्यात यंदा जवळपास १ हजार २८४ गणेश मंडळांनी यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. गुरूवार,२८ सप्टेंबरला श्री गणरायाच्या मुर्तिचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून, पोलीस प्रशासनही सज्ज आहे . एकूण १ हजार २८४ गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे.
लातुरात ६५ मूर्ती संकलन केंद्र स्थापन...
श्री गणेश विसर्जन मिरवणुक काळात लातूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस मदत केंद्र, तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर १२८ सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर रहणार आहे. श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी एकूण ६५ ठिकाणे निश्चित केली असून, त्या ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त...
लातूर जिल्ह्यामध्ये विसर्जन मिरवणूक काळात ७ पोलीस उपाधीक्षक , २७ पोलीस निरीक्षक, ७२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ९५८ पोलीस अंमलदार, त्यांच्या मदतीला ९८५ होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दंगा काबू पथकाचे चार प्लाटून, तसेच शिघ्रकृती दलाचे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत.