मांजरीच्या जि.प. शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:16+5:302021-06-26T04:15:16+5:30

वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष चळवळीचा उपक्रम लातूर : लातूर वृक्ष चळवळीच्या व सह्याद्री देवराईच्या महिला सदस्यांनी येथील गोदावरी देवी कन्या विद्यालय ...

Cat's Z.P. Plantation at school | मांजरीच्या जि.प. शाळेत वृक्षारोपण

मांजरीच्या जि.प. शाळेत वृक्षारोपण

वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष चळवळीचा उपक्रम

लातूर : लातूर वृक्ष चळवळीच्या व सह्याद्री देवराईच्या महिला सदस्यांनी येथील गोदावरी देवी कन्या विद्यालय व राजस्थान विद्यालय येथे वृक्षारोपण करून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली. यावेळी महिला पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, वृक्ष चळवळीच्या महिला समन्वयक डॉ. नीलम पन्हाळे-जाधव, डॉ. वर्षा दराडे, मुख्याध्यापिका सुनीता बोरगावकर, राजश्री कांबळे, आम्रपाली सुरवसे, सुपर्ण जगताप, आशिष बाजपाई, सुपर्ण जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी.आर. पाटील, आशिष अग्रवाल, वर्षा देशपांडे, सिंधू वाघमारे, सोमनाथ सुरवसे, नीलेश चलमले, अमरदीप गुंजोटे, नेताजी जाधव, योगेश बिराजदार, निखिल रेवणवार, अनिल जाधव, पृथ्वीराज पवार‌, खंडेराव गंगणे, संज्ञा महाजन, अपेक्षा सूर्यवंशी, आम्रपाली कांबळे यांची उपस्थिती होती.

इन्फिनिटी फाऊंडेशनची स्पंदन प्रकल्पास मदत

लातूर : शहरात डॉ. विश्‍वास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करीत आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी जपत इन्फिनिटी फाऊंडेशनच्या वतीने नीता कानडे व गिरीश कानडे यांनी स्पंदन सदस्यांचा ऑक्सिजन प्लान्ट भेट देऊन ते करीत असलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांनी स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास दि इन्फिनिटी फाऊंडेशनने १० हजार रुपयाची देणगी डॉ. आदित्य कानडे व सदस्य ईशा कानडे, डॉ. अमृता शिंदे, ओम लवटे, शिवाजी जडे यांच्यावतीने देण्यात आली. यावेळी डॉ. विश्‍वास कुलकर्णी, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ. अजय जाधव, संजय अयाचित, शिरीष कुलकर्णी, श्रीकांत हिरेमठ आदी उपस्थित होते.

श्री केशवराज विद्यालयात योग सप्ताह

लातूर : येथील श्री केशवराज विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात पर्यवेक्षक संजय कुलकर्णी, बालासाहेब केंद्रे, वैशाली ढगे, व्यंकट मुंढे, जयश्री सुगरे, सूरज बाजुळगे, ॲड. जगन्नाथ चिताडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यशवंतराव तावशीकर, कार्यवाह जितेश चापसी, शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराज तावशीकर, डॉ. मनोज शिरुरे यांची उपस्थिती होती. ऑनलाईन याेग सप्ताहात विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

अध्यक्षपदी डाॅ. यादव यांची निवड

लातूर : लोकभूमी प्रतिष्ठानच्या नूतन कार्यकारिणीची निवड बैठकीत एकमताने करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. सतीश यादव यांची तर सचिवपदी डॉ. राजशेखर सोलापुरे यांची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. हरिदास फेरे आणि प्राचार्य डॉ. आशा मुंडे, कोषाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, सहसचिव अनिल कुटवाड, सहकोषाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड तर सदस्य म्हणून प्रा. नयन राजमाने, डॉ. नागेश पाटील, डॉ. सुदाम पवार, बालासाहेब यादव यांची निवड करण्यात आली.

Web Title: Cat's Z.P. Plantation at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.