शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

ट्रॅप नव्हे एसीबीने केली उघड चाैकशी; बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तलाठ्यासह तिघांवर गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: January 20, 2023 19:47 IST

तलाठी आणि कुटुंबातील दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

लातूर : उदगीर तालुक्यातील बाेरगाव (बु.), काेदळी येथे कार्यरत तलाठ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उघड चाैकशीत बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. दरम्यान, याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात तलाठी आणि अन्य दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, ज्ञानाेबा हणमंतराव करमले (वय ३५, रा. हांगरगा ता. मुखेड जि. नांदेड) हा सध्या उदगीर तालुक्यातील बाेरगाव (बु.), काेदळी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, १० ऑक्टाेबर २०१२ ते ३१ ऑगस्ट २०२० या काळात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी करून सत्यता बघून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी ज्ञानाेबा करमले यांच्यावर सापळा लावून ३० ऑगस्ट २०२० राेजी छापा मारला. यावेळी मालमत्तेची उघड चाैकशी करण्यात आली. 

यामध्ये त्याने नाेकरीच्या काळात बेकायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. एकंदरीत परीक्षण कालावधीदरम्यान तलाठ्याने ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ३४ लाख ७५ हजार ८८६ रुपयांची (९८.६५ टक्के) ची अपसंपदा संपादित केल्याची निष्पन्न झाले आहे.

याबाबत जळकाेट पोलिस ठाण्यात तलाठी ज्ञानाेबा हणमंतराव करमले, अलका ज्ञानाेबा करमले (वय २३), हणमंतराव निवृत्ती करमले (वय ६४ रा. हांगरगा ता. मुखेड जि. नांदेड) याच्याविराेधात गुरनं. २१ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भारतीय दंड संहितेचे कलम १०९ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा - २०१८) चे कलम १३ (२), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी सांगितले.

घराची घेतली झडती...पथकाने घराची झडती घेतली असून, ही कारवाई पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर, रमाकांत चाटे, फारुख दामटे, भागवत कठारे, श्याम गिरी, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, दीपक कलवले, संदीप जाधव, मंगेश काेंडरे, गजानन जाधव, रुपाली भाेसले, संताेष क्षीरसागर, आलुरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी