लातूर शहरात घरफोडी; रोख रक्कम, दागिने लंपास, पाच लाखांचा मुद्देमाल पळविला!
By राजकुमार जोंधळे | Updated: January 7, 2024 16:34 IST2024-01-07T16:34:30+5:302024-01-07T16:34:47+5:30
शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात बंदघर फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

लातूर शहरात घरफोडी; रोख रक्कम, दागिने लंपास, पाच लाखांचा मुद्देमाल पळविला!
लातूर : शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात बंदघर फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, एलआयसी कॉलनी परिसरात वास्तव्याला असलेले एक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी बंद घराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. घरात ठेवण्यात आलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज आहे. सकाळी घर फोडल्याची माहिती घरमालकाला मोबाईलवर शेजाऱ्यांनी दिली. त्यांनी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याला याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, पंचनामा केला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.