निवेदनात म्हटले आहे, गेल्या ऑक्टोबर महिन्यात देवणी तालुक्यासह वलांडी भागात अतिवृष्टीमुळे शेत शिवारासह रस्ते आणि पूल पाण्याने वाहून गेले होते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पावसाळा समोर आला आहे. मात्र या भागातील वाहून गेलेल्या पुलांचे तडे व पडलेल्या भगदाडाची संबंधित विभागाकडून अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. तरी पावसाळ्यापूर्वी तडा गेलेल्या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी टिपू सुलतान विचार मंच, वलांडीच्या वतीने देवणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर टिपू सुलतान विचार मंचचे शाखा अध्यक्ष अक्रम शेख, उपाध्यक्ष हमीद तांबोळी, सचिव तौफिक जमीनदार, लहू लोहार, उमाकांत कांबळे यांनी केली आहे.