८०० रुपयांची लाच, दाेघाविराेधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:30+5:302021-06-24T04:15:30+5:30
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील तक्रारदारचा वजन काटा प्रमाणित करून देण्यासाठी जनार्धन नागाेराव ताटे (५९ रा. सिकंदरपूर, ता. लातूर) ...

८०० रुपयांची लाच, दाेघाविराेधात गुन्हा दाखल
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील तक्रारदारचा वजन काटा प्रमाणित करून देण्यासाठी जनार्धन नागाेराव ताटे (५९ रा. सिकंदरपूर, ता. लातूर) आणि हणमंत श्यामराव कदम (५३) या दाेघांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेची लाच म्हणून मागणी केली. दाेघेही औसा येथील वजन-मापे विभागात कार्यरत आहेत. शासकीय शुल्क १ हजार आणि,१ हजाराच्या लाचेची मागणी केली. शेवटी तडजाेड झाल्यानंतर ८०० रुपये घेण्याचे ठरले. याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कासार बालकुंदा येथील ग्रामपंचायत परिसरात बुधवारी सापळा लावला. ८०० रुपयांची लाच स्वीकारताना जनार्धन ताटे याला दुपारी ताब्यात घेण्यात आले.तर हणमंत कदम हा पळून जाण्यात यशस्वी ठरला, अशी माहिती उपअधीक्षक माणिक बेद्रे यांनी दिली. याबाबत कासार शिरसी पाेलीस ठाण्यात लाचप्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पाेलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, रमाकांत चाटे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, माेहन सुरवसे, शिवकांता शेळके, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दीपक कलकले, रूपाली भाेसले, राजू महाजन यांच्या पथकाने केली.