डाेक्यात घातली बिअरची बाटली; एक जण जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: January 19, 2024 20:13 IST2024-01-19T20:13:20+5:302024-01-19T20:13:31+5:30
लातुरातील घटना : एकाविराेधात गुन्हा...

डाेक्यात घातली बिअरची बाटली; एक जण जखमी
राजकुमार जोंधळे / लातूर : मित्राला शिवीगाळ करत असताना, शिवीगाळ करुन नकाे असे म्हणाले असता, एकाने डाेक्यात बिअरची बाटली घालून जखमी केल्याची घटना लातूर शहरातील कन्हेरी चाैकात असलेल्या एका ढाब्यावर घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सुरज बाबुराव पाटील (वय ३० रा. आमलेश्वर नगर, बार्शी राेड, लातूर) यांच्या मित्राला अक्षय कांबळे (रा. दत्तकृपा साेसायटी, जुना औसा राेड, लातूर) हा कन्हेरी चाैकातील एका ढाब्यावर बसले असता शिवीगाळ करत हाेता. दरम्यान, शिवीगाळ करुन नकाे, असे म्हणाल्यानंतर टेबलवरची बिअरची बाटली डाेक्यात घातली. कमरेच्या बेल्टने पाठीवर, ताेंडवर जबर मारहाण करुन शिवीगाळ केली. माझ्याविराेधात काेठे तक्रार केली तर तुला जिवंत साेडणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.