उदगीर बाजार समितीची दोन्ही पदे बिनविरोध

By संदीप शिंदे | Updated: May 23, 2023 17:11 IST2023-05-23T17:11:03+5:302023-05-23T17:11:13+5:30

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवाजीराव हुडे तर उपसभापतीपदी प्रीती भोसले यांची निवड

Both posts of Udgir Bazar Committee unopposed | उदगीर बाजार समितीची दोन्ही पदे बिनविरोध

उदगीर बाजार समितीची दोन्ही पदे बिनविरोध

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणूकीत सभापतीपदी शिवाजीराव हणमंतराव हुडे यांची तर उपसभापतीपदी प्रीती चंद्रशेखर भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर बाजार समितीच्या निवडून आलेल्या संचालकांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सभापती पदासाठी शिवाजीराव हुडे व उपसभापती पदासाठी प्रीती भोसले यांचे प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्यामुळे हुडे व भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नांदापूरकर यांनी जाहीर केले.

आनंदाश्रू व दुःखाश्रु...
सभापतीपदी बिनविरोध निवड झालेले शिवाजीराव हुडे यांच्या एका डोळ्यात आनंदाश्रु होते. तर दुसऱ्या एका डोळ्यात दुःखाश्रु होते. हुडे यांच्या आईचे निधन झाल्यामुळे मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करून सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नांदापूरकर यांनी जाहीर करताच त्यांच्या एका डोळ्यात आनंदाश्रु होते तर एका डोळ्यात दुःखाश्रु वाहत होते.

Web Title: Both posts of Udgir Bazar Committee unopposed