रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडविले; एक जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2024 19:29 IST2024-01-13T19:29:20+5:302024-01-13T19:29:32+5:30
औसा-उमरगा महामार्गावरील फत्तेपूर पाटीनजीक अपघात

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडविले; एक जागीच ठार
औसा (जि. लातूर) : रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडविल्याने एक जागीच ठार झाल्याची घटना औसा तालुक्यातील औसा-उमरगा महामार्गावरील फत्तेपूर पाटीनजीक शुक्रवारी रात्री ७:४५ वाजता घडली. महेमूद चाँदसाब शेख (वय ४८, रा. उजेड, ता. शिरुर अनंतपाळ) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी औसा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पाेलिसांनी सांगितले, औशाकडून अज्ञात भरधाव वाहन लामजनाकडे जात होते. दरम्यान, फत्तेपूर पाटीनजीक महेमूद शेख हे रस्ता ओलांडत हाेते. यावेळी भरधाव वाहनाने त्यांना जाेराने उडविले. या अपघातात ते जागीच ठार झाले. याबाबत औसा पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून अज्ञात वाहनचालक पसार झाला आहे. त्याचा पाेलिसांकडून शाेध घेतला जात आहे. मृत महेमूद शेख यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.